Join us  

TRP Scam: ...अन् टीआरपी घोटाळ्याचा पदार्फाश झाला; 'एक्स्ट्रा मीटर'मुळे धक्कादायक प्रकार उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 3:33 AM

फक्त मराठी, बॉक्स मराठीचीही होणार चौकशी

मुंबई : मुंबई पोलिसांनी वृत्त व मनोरंजन वाहिन्यांचा टीआरपी (टेलिव्हीजन रेटिंग पॉइंट) घोटाळा उघडकीस आणल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य वित्तीय अधिकारी शिवा सुब्रमण्यम सुंदरम यांना शनिवारी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजाविले. तसेच, ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स मराठी’सह दोन जाहिरात कंपनीच्या प्रमुखांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावल्याची माहिती पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.हंसा एजन्सीचे माजी कर्मचारी दिनेश विश्वकर्मा आणि विनय त्रिपाठी हे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या ‘टीआरपी’ वाढवणाऱ्या रॅकेटप्रकरणी हंसा कंपनीच्या विशाल भंडारीसह चौघांना अटक करण्यात आली आहे.रिपब्लिक टीव्हीवर टीआरपी घोटाळ्याचा ठपका बसताच, टीआरपीबाबत दाखल गुन्ह्याची एफआयआर कॉपी सोशल मीडियावर व्हायरल झाली. यात, इंडिया टुडेचे नाव समोर आल्याने चर्चेत, आरोप प्रत्यारोपात भर पडली. याबाबत स्पष्टीकरण करताना, सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे म्हणाले, टीआरपीसाठी पैसे दिल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात इंडिया टुडेचे नाव आहे. मात्र अटक आरोपी किंवा कोणत्याही साक्षीदाराने याबाबत ठोस माहिती दिलेली नाही. याउलट या प्रकरणातील आरोपी आणि साक्षीदार खासकरून रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा यांचे नाव घेत आहेत. मुंबई पोलीस याचा सर्व दिशेने तपास करत असल्याचे सांगितले.असे आले प्रकरण उघडकीस११ जून रोजी हंसा कंपनीचे कर्मचारी बॅरोमीटरची पाहणी करण्यासाठी मालाडच्या वेदप्रकाश भंडारी यांच्या घरी गेले. तेथे त्यांना आणखी एक मीटर असल्याचे आढळले. चौकशीत भंडारी यांचा मुलगा विशाल भंडारी हा हंसा कंपनीत काम करत असल्याचे समोर आले. त्यानुसार हंसा कंपनीने भंडारीकडे केलेल्या चौकशीत, तो मार्च २०१९ मध्ये हंसा कंपनीत नोकरीस होता असे सांगण्यात आले. त्यादरम्यान नोव्हेंबर २०१९ मध्ये विनय त्रिपाठी नावाच्या व्यक्तीने त्याच्याशी संपर्क साधून, मुंबईच्या ज्या घरांमध्ये बॅरोमीटर लावलेले आहेत, अशा पाच घरांमध्ये दिवसातून किमान दोन तास इंडिया टीव्ही चॅनल पाण्यासाठी उद्युक्त करण्यास सांगितले. त्याबदल्यात त्यांना दोन तासांसाठी दोनशे रुपये देण्याचे आमिष दाखवले. कमिशन मिळणार म्हणून मी तयार झालो असे विशालने सांगितले. मात्र कांदिवलीच्या तेजल सोलंकी यांच्या घरी जाऊन चौकशी केली असता त्यांनी इंडिया टुडे पाहण्यासाठी पैसे मिळाल्याचे कबूल केले. परंतु त्यांच्या घरी ते चॅनलच नसल्याचे समोर आले.महिन्याला २० हजार रुपयेविशाल भंडारी हा अटक आरोपी बोमपेल्ली राव मिस्त्री याच्या सांगण्यावरून काम करत होता. मिस्त्री हा विशालला महिन्याकाठी २० हजार देत बॅरोमीटर लावलेल्या आठ ते दहा घरांमध्ये जाऊन फक्त मराठी आणि बॉक्सवर सिनेमा पाहणाऱ्यांना चारशे ते पाचशे रुपये देण्यास सांगत होता. रॉकी नावाची व्यक्ती रिपब्लिक न्यूज पाहण्यासाठी पैसे देत असल्याचे समोर आले. तसेच बीएआरसीनेही रिपब्लिकच्या टीआरपीबाबत संशय व्यक्त केला. मिस्त्रीने रिपब्लिक टीव्ही न्यूज, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा जास्तीतजास्त पाहण्यासाठी पैसे मिळत असल्याची कबुली दिली.

टॅग्स :अर्णब गोस्वामीरिपब्लिक टीव्ही