Join us

स्मृती चौथऱ्याचा विस्तार अडचणीत

By admin | Updated: January 10, 2016 01:46 IST

शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान असल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात आलेला चौथरा वाढविण्यास मुंबई पुरातन वास्तू जतन समितीने अप्रत्यक्ष

मुंबई : शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान असल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात आलेला चौथरा वाढविण्यास मुंबई पुरातन वास्तू जतन समितीने अप्रत्यक्ष आक्षेप घेतला आहे़ २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुखांची जयंती आहे़ त्याआधी शिवतीर्थावरील त्यांचा स्मृती चौथरा आणखी भव्य स्वरूपात बांधून सुरक्षित करण्याचे शिवसेनेने ठरविले होते़ यासाठी मुंबई पुरातन वास्तू जतन समिती आणि महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे़ त्यानुसार शिवसेनेने प्रशासनाच्या माध्यमातून याबाबतचा प्रस्ताव पुरातन समितीपुढे पाठविला होता़ मात्र समितीने या प्रस्तावाला नकार दर्शविल्याचे समजते़ याबाबतचे पत्र उद्यान विभागाला पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले़