Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांमुळे फसला आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 05:38 IST

बोरिवली येथे लोकलसमोर उडी मारुन एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न रविवारी रात्री केला. बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी वेळीच सतर्क होत तिला वाचवत रुग्णालयात दाखल केले.

मुंबई : बोरिवली येथे लोकलसमोर उडी मारुन एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न रविवारी रात्री केला. बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी वेळीच सतर्क होत तिला वाचवत रुग्णालयात दाखल केले. संगीता विश्वकर्मा (३०) असे तिचे नाव आहे.मालाड पूर्वेकडील आप्पापाडा परिसरात ती राहत असून तिला दोन मुले आहेत. रविवारी पहाटे बोरिवली रेल्वे स्थानकावर आलेल्या गाडीसमोर तिने उडी मारली. ही बाब लोहमार्ग पोलिसांनी पाहिली आणि तिला तातडीने कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. संगीताच्या दोन्ही पायाचे तळवे फाटले आहेत. व्यसनी पतीच्या त्रासाला कंटाळून तिने स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.