Join us
Daily Top 2Weekly Top 5

फसव्या ट्रक चालकांची कुंडली सोशल साइटवर

By admin | Updated: November 30, 2015 02:48 IST

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ट्रक ड्रायव्हर्सची माहिती आता www.drivers420.com या सोशल नेटवर्किंग पेजवर उपलब्ध होणार आहे.

मुंबई : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ट्रक ड्रायव्हर्सची माहिती आता  www.drivers420.com या सोशल नेटवर्किंग पेजवर उपलब्ध होणार आहे. फेडरेशन आॅफ बॉम्बे मोटर ट्रान्सपोर्ट आॅपरेटर या मालवाहतूकदारांच्या शिखर संघटनेने गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती उपलब्ध होण्यासाठी ‘ड्रायव्हर्स ४२०’ या पेजची निर्मिती केली आहे.या संदर्भातील अधिक माहिती देताना वेब पोर्टलचे संस्थापक बाल मलकित सिंह म्हणाले की, ‘देशात काही ट्रक, ट्रेलर, टेम्पो ड्रायव्हर्सची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. मात्र, एखाद्या मालकाची फसवणूक झाल्याचे, मालकाचा माल किंवा गाडी विकून ड्रायव्हर्स पसार झाल्याचे अनेक प्रकार घडत आहेत. एकाच ड्रायव्हरने अनेक मालकांना फसवल्याचेही संघटनेच्या निदर्शनास आले आहे. मात्र, कामावर ठेवताना कोणता ड्रायव्हर कसा आहे, हे तपासण्यासाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्त्वात नाही. परिणामी, गुन्हेगारी वृत्तीच्या ड्रायव्हर्सची माहिती संपूर्ण देशातील मालवाहतूकदारांना मिळावी, म्हणून या वेब पेजची मदत होईल.एखाद्या ड्रायव्हरने मालकाला फसवल्यास त्याच्याविरोधात दाखल झालेल्या एफआयरची प्रत मालवाहतूकदाराला पेजवर अपलोड करावी लागणार आहे.