पनवेल : पडघा येथील आदिवासी वसतिगृहात भाडे थकीत प्रकरणामुळे घरमालकाने वसतिगृह सोडण्यासाठी बजावलेल्या नोटिसीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी सुरू केलेले कपडे काढो आंदोलन तहसीलदार पवन चांडक यांच्या मध्यस्थीनंतर शुक्रवारी मागे घेतले.पडघे येथील आदिवासी वसतिगृहात एकूण १९२ विद्यार्थी राहत आहेत. घरमालकाने दिलेल्या नोटिशीनंतर या विद्यार्थ्यांनी खांदा कॉलनीतील शासकीय आदिवासी वसतिगृहात तळ ठोकत कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत पनवेलचे तहसीलदार पवन चांडक यांनी लवकरात लवकर नवीन वसतिगृहासाठी जागा शोधली जाईल, असे अश्वासनानंतर आंदोलन स्थगित केल्याचे विद्यार्थी प्रतिनिधी सुनील तोटावाड यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे
By admin | Updated: April 4, 2015 05:35 IST