विक्रमगड : तालुक्यात विविध योजनावर दरवर्षी कोट्यावधीचा निधी खर्च होत असल्याचे शासकीय अहवालातून स्पष्ट होते. मात्र, अजूनही आदिवासीच्या आरोग्याची परवड काही थांबलेली नाही. आदिवासीपर्यंत सुविधा पोहोचतच नसल्याने योजना येतात, गाजावाजा होतो पण निधी जातो कुठे? व सुविधा नेमक्या होतात कुठे हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.तालुक्यात एक ग्रामीण रुग्णालय तीन प्राथमिक रुग्णालय १६ उपकेंद्र असतानाही आरोग्याची योग्य सुविधा रुग्णाना मिळत नाही. विक्रमगड येथील ग्रामीण रुग्णालयात बालरोग्, स्त्रीरोग डॉक्टर नाही. आॅपरेशन रुम आहे परंतु तज्ज्ञ डॉक्टर नाहीत कर्मचारी नाहीत कर्मचारी निवास नाही. सोनोग्राफी एकस-रे मशिन त्यांना लागणारे साहित्य नाहीत अशा अनेक समस्या अनेक वर्षांपासून आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था या पेक्षा वेगळी नाही. त्यामुळे नाईलाजाने रुग्णाना खासगी रुग्णालयात जावे लागते. तालुक्यात झपाट्याने विकास झाला पाहिजे. या प्रतिक्षेत नागरिक आहे. परंतु विकास खुंटलेला दिसत आहे. गेल्या कित्येक वर्षे ग्रामीण रुग्णालये व इतर रुग्णालये संयुक्त प्रयत्न होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु ती होताना दिसत नाही. तालुक्यात सुसज्ज हॉस्पिटलची प्रतिक्षा आहे. ५० खाट्यांचे हॉस्पिटल मंजूर आहे. त्यासाठी लागणारी सुविधाही मंजूर करावी व जिल्हा परिषदअंतर्गत येणाऱ्या आरोग्य सुविधाही सुधाराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.(वार्ताहर)
आदिवासीच्या आरोग्याची परवड
By admin | Updated: September 25, 2014 00:38 IST