Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मुलीला पळविले

By admin | Updated: May 25, 2014 00:20 IST

येथील एका १७ वर्षीय आदिवासी मुलीला फुस लावून एका परप्रांतीय तरूणाने पळविले.

तलासरी : येथील एका १७ वर्षीय आदिवासी मुलीला फुस लावून एका परप्रांतीय तरूणाने पळविले. याबाबत तलासरी पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली असून तलासरी पोलीस परप्रांतीय तरूणाचा व आदिवासी मुलीचा शोध घेत आहेत. तलासरी तालुक्यातील कोचाई-वरीपाडा येथील १७ वर्षीय आदिवासी मुलगी गुजरात राज्यातील भिलाड येथील एका कारखान्यात कामाला जायची. तेथेच काम करणार्‍या एका परप्रांतीय तरूणाशी तिची ओळख वाढली. या ओळखीतून त्या तरुणाने तिला पळवून नेल्याची तक्रार तिच्या कुटूंबाने केली आहे. तलासरी तालुक्यात ७ वी नंतर ८ वी इयत्तेत प्रवेश मिळत नसल्याने मोठ्या संख्येने आदिवासी मुली नाईलाजास्तव शिक्षण सोडून रोजगाराकडे वळतात. येथील आदिवासी मुली गुजरात राज्यातील उंबरगाव, संजान, भिलाड, वापी, सिल्व्हासा येथे रोजगारासाठी जातात. तसेच जेथे काम करतात तेथील परप्रांतीय तरूणांच्या आमिषाला बळी पडून त्यांच्याबरोबर पळून जाण्यासारख्या अनेक घटना तलासरी परिसरात घडलेल्या आहेत. (वार्ताहर)