Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना रानभाजीचा आधार

By admin | Updated: June 20, 2015 22:41 IST

मुरबाड तालुक्यात ३६-४० टक्के समाज हा आदिवासी आहे. हा समाज सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात राहत आहे. त्यांना आपला उदरिनर्वाह

धसई : मुरबाड तालुक्यात ३६-४० टक्के समाज हा आदिवासी आहे. हा समाज सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात राहत आहे. त्यांना आपला उदरिनर्वाह भागविण्यासाठी निसर्गातील रानमेव्यावर अवलंबून राहवे लागते. रानात दिवसभर फिरु न रानभाज्या जमा कराव्या लागतात. त्या तालुक्यातील टोकावडे, धसई, सरळगाव, मुरबाड या बाजरपेठांमध्ये विक्र ीस आणून त्यापासून त्यांना रोजगार मिळतो. रानभाजी या मुळातच चांगली व आयुर्वेदिक असल्याने अनेक लोक त्या खरेदी करतात. यामध्ये लवंडी, कारवा, बाफळी, चायवळ, लोत, शेवळा, यांचा समावेश आहे. आदिवासी महिला २० रु पयाला ३ जुडी प्रमाणे त्या विकतात. त्यामधून त्यांना प्रति दिवस ४५०-५०० रु पये मिळतात. तालुक्यातील ओलमण, बाटलीचीवाडी, गेटाचीवाडी, झुगरेवाडी, या आदिवासी वाड्यांतील कुटुंबाना यातून मिळणाऱ्या पैशाचा आधार मिळतो. शेवळा ही अतिशय लोकप्रिय भाजी आहे. जून महिन्यात मोठ्या प्रमाणात तिला मागणी असते. ही भाजी सुकवून तसेच ओली या दोन्ही पद्धतीने खायाला चविष्ट असल्याने तिच्याकडे शाकाहरी व मांसाहरी व्यक्ती आकर्षित होतात. रानात मिळणाऱ्या कंदापासून वळ्या बनविल्या जातात. त्या उपवासाच्या तसेच इतर दिवशीही खाल्या जातात. (वार्ताहर)