Join us

जव्हार येथे आदिवासी कला महोत्सव

By admin | Updated: April 25, 2015 22:25 IST

तालुक्यातील खरवंद येथे स्वातंत्र्यसैनिक रेवजीभाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक प्रतिष्ठाण, खरवंदतर्फे आदिवासी कला महोत्सवाचे आयोजन जुना राजवाडा प्रांगणात करण्यात आले आहे.

जव्हार : तालुक्यातील खरवंद येथे स्वातंत्र्यसैनिक रेवजीभाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक प्रतिष्ठाण, खरवंदतर्फे आदिवासी कला महोत्सवाचे आयोजन जुना राजवाडा प्रांगणात करण्यात आले आहे. उद्घाटनाला खासदार चिंतामण वनगा, जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा थेतले, सुनील भुसारा, प्रकाश निकम, माजी नगराध्यक्ष दिनेश भट, माजी नगराध्यक्ष कांचनमाला चुंबळे, नगरसेविका आशा बल्लाह, गीता चौधरी, नामदेव खिवारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.याप्रसंगी मार्गदर्शन करताना खासदार चिंतामण वनगा म्हणाले, रेवजीभाई चौधरी यांना समाजाबद्दल आस्था होती. समाज सुधारण्यासाठी त्यांची असलेली तळमह अगदी जवळून बघीतली असून ते आपले प्रेरणास्थान असल्याचे सांगितले.जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले म्हणाल्या, रेवजीभाई चौधरी यांचे कार्य मोठे होते. आज त्यांच्याच आदर्शमुळे मी जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाल्याचे त्या म्हणाल्या. प्रकाश निकम यांनी या उपक्रमाचे कौतूक केले. याप्रसंगी विष्णू चौधरी, गोपाळ बोरसे, नारायण शेंडे यांनी महोत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. यानंतर तालुक्यातील विविध भागातून आलेल्या पथकांनी कला सादर केली. महोत्सव पाहण्यासाठी विविध भागातून नागरिक येथे दाखल झाले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आदिवासी कला, संस्कृती, परंपरेचे अनेक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. (वार्ताहर)