Join us
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारमध्ये वृक्ष कोसळला

By admin | Updated: July 19, 2014 00:36 IST

तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे

जव्हार : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे. त्यामुळे धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या संरक्षक भिंतीला लागून असलेले खैराचे झाड शुक्रवारी सकाळी संरक्षक भित तोडून रस्त्यावर कोसळले, त्यामुळे बांधकाम कार्यालयासमोरील मुख्य रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला होता.गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जव्हारमध्ये बरसणाऱ्या वाऱ्यासह पावसाने चांगलाच जोर लावला, त्यामुळे पावसाच्या संततधारेमुळे जमीन खचून २० वर्षे जुने मोठे झाड पशुवैद्यकीय दवाखान्याची भिंत तोडून थेट समोर असलेल्या बांधकाम विभागाच्या संरक्षक भिंतीवर जाऊन आदळले, मात्र या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेत पशुवैद्यकीय दवाखान्याच्या भिंतीचे मोठे नुकसान झालेले आहे, वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविली.न.प.च्या कर्मचाऱ्यांनी कामगारांच्या मदतीने रस्ता मोकळा केला. (वार्ताहर)