Join us

टेम्पोरोमँडिब्युलर दोषांवर आॅर्थोस्कोपिक तंत्राने उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 06:38 IST

मानवी कवटी व जबडा यांना जोडणारे दोन सांधे म्हणजे टेम्पोरोमँडिब्युलर. या सांध्यांमध्ये दोष निर्माण झाल्यास त्यामुळे घास चावताना किंवा जबडा उघडताना खूप त्रास होतो.

मुंबई : मानवी कवटी व जबडा यांना जोडणारे दोन सांधे म्हणजे टेम्पोरोमँडिब्युलर. या सांध्यांमध्ये दोष निर्माण झाल्यास त्यामुळे घास चावताना किंवा जबडा उघडताना खूप त्रास होतो. या अस्थिविकारावर आॅर्थोस्कोपिक तंत्राने उत्तम उपचार करण्याची सुविधा डॉ. मुकुल पाध्ये, डॉ. ऐश्वर्या नायर, डॉ. अभिनव हिरे या तीन मॅक्सिलोफेशियल तज्ज्ञांनी आता प्रथमच मुंबई, ठाणे, नवी मुंबईत उपलब्ध करून दिली आहे.या तीनही वैद्यकीय तज्ज्ञांनी आॅर्थोस्कोपिक तंत्राने उपचार करण्याचे प्रशिक्षण अमेरिकेत घेतले आहे. ब्रीच कँडी रुग्णालयात एका रुग्णाच्या टेम्पोरोमँडिब्युलर सांध्यांमध्ये निर्माण झालेला दोष आॅर्थोस्कोपिक तंत्राने दूर करण्याची यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. मुकुल पाध्ये, डॉ. ऐश्वर्या नायर, डॉ. अभिनव हिरे यांनी नुकतीच पार पाडली. अशा प्रकारची मुंबईत झालेली ही पहिलीच शस्त्रक्रिया होती.ज्या रुग्णांच्या टेम्पोरोमँडिब्युलर सांध्यांत दोष आहे, त्यांच्यावर नवी मुंबईतील डी. वाय. पाटील रुग्णालयात या वैद्यकीय तज्ज्ञांच्या सहाय्याने आॅर्थोस्कोपिक तंत्राने उपचार केले जातात.