मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचा दावा रेल्वे पोलिसांकडून (जीआरपी) केला जातो. मात्र असे असले तरी महिला प्रवाशांबाबतचे गंभीर गुन्हे काही कमी होताना दिसत नाहीत. २०१४ मध्ये ८९ तर २०१३ मध्ये ७५ गुन्ह्यांची नोंद झाल्याचे रेल्वे पोलिसांतील सूत्रांनी सांगितले. महिला प्रवाशांसंदर्भातील गुन्हे गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढत असून, त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ही जीआरपीची आहे. तर आरपीएफकडूनही महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेकडून १३११ आणि मध्य रेल्वेकडून १२७५ हे हेल्पलाइन नंबर देण्यात आले आहेत. धोका वाटल्यास त्याचा वापरही प्रवाशांकडून केला जातो, तरीही गुन्हे कमी होताना दिसत नाहीत. २०१४मध्ये विनयभंगाच्या ६२ आणि अपहरणाच्या १७ गुन्ह्यांची नोंद आहे. तर २०१३ मध्ये विनयभंगाच्या ४१ आणि छेडछाडीच्या २२ गुन्ह्यांची नोंद असल्याचे सांगण्यात आले.
महिलांसाठी प्रवास धोक्याचा!
By admin | Updated: May 4, 2015 00:02 IST