Join us
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कार्यालय ते मुख्यालयापर्यंत प्रवास

By admin | Updated: March 29, 2015 00:57 IST

ग्रामपंचायत कार्यालय, समाजमंदिर अशा मोजक्या मालमत्तांच्या बळावर पालिकेची वाटचाल सुरू झाली. २३ वर्षांच्या वाटचालीमध्ये पालिकेच्या मालकीच्या तब्बल १५६३ मालमत्ता झाल्या आहेत. १

नवी मुंबई : ग्रामपंचायत कार्यालय, समाजमंदिर अशा मोजक्या मालमत्तांच्या बळावर पालिकेची वाटचाल सुरू झाली. २३ वर्षांच्या वाटचालीमध्ये पालिकेच्या मालकीच्या तब्बल १५६३ मालमत्ता झाल्या आहेत. १९५ कोटी रुपयांचे अत्याधुिनक मुख्यालयासह अनेक वास्तू पालिकेने उभारल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर स्वत:च्या मालकीचे धरण विकत घेणारी नवी मुंबई ही एकमेव महापालिका ठरली आहे. ग्रामपंचायतीमधून थेट महापालिकेत रूपांतर झालेली नवी मुंबई राज्यातील एकमेव पालिका. पालिकेची स्थापना झाली तेव्हा ग्रामपंचायतीच्या मालकीची कार्यालये, समाजमंदिरे, जिल्हा परिषदेच्या शाळा अशा मोजक्या जवळपास १०० मालमत्ता पालिकेच्या ताब्यात आल्या. सुरुवातील सीबीडी सेक्टर-१ मधील छोट्याशा इमारतीमधून पालिकेचा कारभार सुरू झाला. नंतर रेल्वे स्टेशनसमोरील इमारतीमध्ये चार मजले विकत घेऊन तेथे मुख्यालय सुरू करण्यात आले. तब्बल १५६३ मालमत्ता पालिकेच्या ताब्यात आहेत. स्वातंत्र्यानंतर स्वत:च्या मालकीचे धरण विकत घेणारी नवी मुुंबई देशातील एकमेव महापालिका ठरली आहे. धरण परिसराची १८०० एकर जमीन पालिकेच्या ताब्यात आहे. यामुळे पालिकेचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. शहरात ६८ शाळा असून स्कूल व्हिजनच्या माध्यमातून बहुमजली इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत. सिडकोने शहराची रचना करताना प्रत्येक नोडमध्ये मैदान व उद्यानांसाठी भूखंड राखून ठेवले आहेत. सद्यस्थितीमध्ये १९९ उद्याने पालिकेने विकसित केली आहेत. ७ लाख ६२ हजार चौरस मीटर जागा उद्यानांनी व्यापली आहे. रॉक गार्डन व चिल्ड्रन पार्कसारखी चांगली उद्याने पालिकेच्या ताब्यात आहेत. पालिकेची स्थापना झाल्यानंतर अनेक ठिकाणचा कारभार भाड्याच्या वास्तूमध्ये करण्यात येत होता. परंतु २३ वर्षांमध्ये पालिकेच्या अर्थसंकल्पाचा आकडा वाढत गेला. मालमत्तांमध्येही वाढ झाली आहे. पालिकेच्या सर्व मालमत्तांची किंमत १५ हजार कोटींपेक्षा जास्त झाली आहे. भविष्यात अजून अनेक भूखंड सिडको व एमआयडीसीकडून पालिकेस मिळणार असून पालिका अजून श्रीमंत होणार आहे. (प्रतिनिधी)श्रीमंत महापालिका च्वाशीमध्ये विष्णुदास भावे सभागृह असून त्याच धर्तीवर ऐरोलीमध्ये सभागृह उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.च्नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वाशीमध्ये प्रथम संदर्भ रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. च्ऐरोली व नेरूळमध्ये १०० बेडचे रुग्णालय बांधण्यात आले आहे. बेलापूर, तुर्भे, कोपरखैरणेमध्येही माताबाल रुग्णालये आणि प्रत्येक नोडमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे.