Join us

ग्रेड सेपरेटरमध्ये वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:11 IST

ग्रेड सेपरेटरमध्ये मंगळवारी दुपारी ट्रक बंद पडला. त्यामुळे मोठी वाहतूककोंडी झाली. एका खासगी मोटारीतून रुग्णाला रुग्णालयात नेले जात होते.

पिंपरी : ग्रेड सेपरेटरमध्ये मंगळवारी दुपारी ट्रक बंद पडला. त्यामुळे मोठी वाहतूककोंडी झाली. एका खासगी मोटारीतून रुग्णाला रुग्णालयात नेले जात होते. मात्र मोटार या वाहतूककोंडीत अडकली. पुण्याकडे जाणाºया मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याने या मोटारीला वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यास उशीर झाला. मनस्ताप सहन करावा लागल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या.या ठिकाणी मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. मंगळवारी दुपारी पिंपरी चौकाकडून पुण्याच्या दिशेने जाणारा ट्रक ग्रेड सेपरेटरमध्ये बंद पडला. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. बीआरटी मार्गावर उभ्या केलेल्या चारचाकी वाहनांमुळे वाहतूककोंडीत अधिक भर पडली. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी प्रशासनाने योग्य ते नियोजन करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.