Join us  

अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे वाहतूककोंडी; वाढत्या वाहनसंख्येचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 1:40 AM

मुंबई आणि परिसरातील लोकांची राहण्याची घनता जास्त आहे. मुंबईमध्ये सगळीकडे सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे जी जागा गाड्यांसाठी मिळत होती तीही मिळत नाही

मुंबई : मुंबई शहर वाहतूककोंडीमध्ये अव्वल असल्याचे एका अहवालातून समोर आले होते. या वाहतूककोंडीस वाढती वाहनसंख्या आणि अपुरी पार्किंग व्यवस्था असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

याबाबत वाहतूक तज्ज्ञ सुधीर बदामी म्हणाले की, मुंबई आणि परिसरातील लोकांची राहण्याची घनता जास्त आहे. मुंबईमध्ये सगळीकडे सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे जी जागा गाड्यांसाठी मिळत होती तीही मिळत नाही. तसेच सार्वजनिक वाहतूक प्रणाली ढासळली आहे. बेस्टला जाण्यासाठी जागा मिळत नाही, त्यांची फ्रिक्वेन्सी कमी असते. त्यामुळे लोक दुचाकी किंवा चारचाकी वाहन घेतात. गाड्यांची संख्या वाढली आहे आणि रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडी वाढली आहे.

मुंबईत दर तासाला ३ लाख ६० हजार जण रेल्वेतून प्रवास करतात. परंतु रेल्वेची क्षमता १ लाख ८० हजार प्रवाशांची आहे. उर्वरित एक लाख ८० हजार प्रवाशांसाठी व्यवस्था उभी करणे आवश्यक आहे. सरकार मेट्रो उभारत आहे; परंतु त्यामुळे केवळ ९६ हजार प्रवाशांची सोय होणार आहे. तर उर्वरित ८४ हजार प्रवाशांसाठी व्यवस्था नाही. त्यावर उपाय करण्यासाठी बीआरटीस प्रणाली वापरायला हवी, असे बदामी या वेळी म्हणाले.

तर वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार म्हणाले की, मुंबईतील लोकसंख्येयची घनता जास्त आहे, रस्त्यांची संख्या कमी आहे. पूर्वी वाहनांच्या पार्किंगला रोड रेशोनुसार २० टक्के जागा लागत होती. आता ८० टक्के जागा लागत आहे. वाहने स्वस्त झाली आहेत. त्यावर नियंत्रण नाही. दरवर्षी १० टक्के गाड्या वाढतात. एका गाडीला तीन पार्किंग जागा लागतात. पार्किंगवर नियंत्रण आणले पाहिजे, रस्त्यावर गाड्या पार्किंग १० पटीने वाढले आहे. एक बस तीन गाड्यांची जागा व्यापते पण त्यामध्ये तीन गाड्यांतून जास्त माणसे बसतात. त्यामुळे सार्वजनिक प्रवास वाढवला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

सार्वजनिक पार्किंगची सोय असावीदुचाकी आणि चारचाकी वाहने घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच ओला किंवा उबेरसारख्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर कमी केला जात आहे. परंतु वाहतूककोंडी होते असे वाटत नाही. अनेकदा रस्त्यावर पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. परंतु बºयाच ठिकाणी सार्वजनिक पार्किंगची सोय नसून सार्वजनिक पार्किंगची सोय असावी. - रत्नाकर सावंत, पोलीस निरीक्षक, वडाळा वाहतूक विभाग

टॅग्स :वाहतूक कोंडीपार्किंग