Join us

वाहतूक पोलीस विभाग कोट्यधीश

By admin | Updated: June 25, 2015 03:11 IST

शहर आणि उपनगरातील वाहनचालकांकडून गेल्या पाच महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे नियम मोडण्यात आले आहेत.

मुंंबई : शहर आणि उपनगरातील वाहनचालकांकडून गेल्या पाच महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे नियम मोडण्यात आले आहेत. या वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी केलेल्या दंडात्मक कारवाईतून तब्बल ९ कोटी ८५ लाख ३२ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. पाच महिन्यांतील ही सर्वात मोठी दंडात्मक कारवाई आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून त्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचीही संख्या वाढत आहे. बेदरकारपणे वाहन चालवणे, वेगाने वाहन चालवणे, सिग्नलचे आणि मार्गिकेचे नियम मोडणे, नो पार्किंगचे नियम मोडतानाच कर्णकर्कश हॉर्न वाजवणे, सेफ्टी बेल्टचे नियम न पाळणे, विनाहेल्मेट दुचाकी चालवणे तसेच दारू पिऊन वाहन चालवणे यासह अनेक वाहतुकीचे नियम वाहनचालकांकडून मोडले जात आहेत. त्याविरोधात वाहतूक पोलिसांनी २0१५ मधील जानेवारी ते मेपर्यंत केलेल्या कारवाईत तब्बल ८ लाख ९४ हजार २0 वाहनचालक अडकले आहेत.