Join us

वाहतूक मंत्री दिवाकर रावतेंच्या गाडीला अपघात

By admin | Updated: January 6, 2016 16:55 IST

राज्याचे वाहतूक मंत्री व शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या गाडीला मुंबईत अपघात झाला असून रावते सुदैवाने बचावले आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - राज्याचे वाहतूक मंत्री व शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या गाडीला मुंबईत अपघात झाला असून रावते सुदैवाने बचावले आहेत. त्यांच्या ड्रायव्हरला मुका मार लागला आहे. आज बुधवारी दुपारी हा प्रकार घडला. धडक एवढी जोरदार होती की गाडीचा ड्रायव्हरच्या बाजुचा भाग पार चेपला गेल्याचे दिसत आहे.
रस्त्यावरील सुरक्षा आणि रॅश ड्रायव्हिंगला प्रतिबंध कसा करता येईल यांसदर्भातली महत्त्वाची बैठक संपवून रावते परत येत होते. त्यावेळी लोअर परेलमध्ये फिनिक्स मिलजवळ एका भरधाव गाडीने रावतेंच्या गाडीला धडक दिली. रावते यांना जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले, व थो़ड्याच वेळात त्यांना डिसचार्जही देण्यात आला.
रावतेंच्या गाडीला धडक देणा-या गाडीच्या ड्रायव्हरला एन. एम. मार्ग पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.