Join us

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

By admin | Updated: May 2, 2016 07:56 IST

आसनगाव - वासिंददरम्यान मालगाडीचं इंजिन ठप्प झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 02 - आसनगाव - वासिंददरम्यान मालगाडीचं इंजिन ठप्प झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. इंजिन बाजूला काढण्यात यश आलं आहे मात्र याचा परिणाम मध्ये रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला आहे. मुंबईहून कसा-याकडे जाणा-या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईहून कसा-याच्या दिशेने जाणा-या लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.