Join us

मिलिंद चंपानेरकर यांना अनुवाद पुरस्कार

By admin | Updated: February 23, 2017 04:43 IST

‘लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र’ या पुस्तकास साहित्य अकादमी अनुवाद

मुंबई : ‘लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र’ या पुस्तकास साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार-२०१६ मंगळवारी जाहीर झाला आहे. या पुस्तकाचा अनुवाद मिलिंद चंपानेरकर यांनी केलेला आहे. या पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये रोख, ताम्रपदक असे आहे. या पुरस्कारांचे वितरण एका विशेष कार्यक्रमात केले जाणार आहे.साहित्य अकादमीचे अध्यक्ष प्राध्यापक विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, मराठी भाषेच्या अनुवादकासाठी मिलिंद चंपानेरकर यांच्या नावाची निवड करण्यात आली. अन्य २१ भाषांसाठीही साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार २०१६ जाहीर झालेला आहे. या पुस्तकांची निवड समिती ही त्रिसदस्यी असते. ‘सईद अख्तर मिर्जा लिखित एम्मी : लेटर टु ए डेमोक्रेटिक मदर (आत्मकथा)’ हे पुस्तक मूळ इंग्रजीत आहे. साहित्य अकादमीच्या वतीने डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. माया पंडित, डॉ. संतोषकुमार भुमकर ही त्रिसदस्यी समिती मराठी अनुवादकाच्या पुस्तकासाठी नेमण्यात आली होती. १ जानेवारी २०१० ते ३१ डिसेंबर २०१४ पर्यंतच्या काळात अनुवाद झालेल्या प्रकाशित पुस्तकांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)