डोंबिवली : ऐरोलीजवळ दुरुस्ती वाहनाचा बेल्ट (टीआरटी मशीन) रुळांत अडकल्याने ठाणे - वाशी ट्रान्स हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील लोकल चार तास ठप्प झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ५.१५ च्या सुमारास घडली. या गोंधळामुळे ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. दुरुस्तीचे काम करणाऱ्या वाहनाचाच अपघात झाल्याने तसेच दुरुस्तीसह अन्य कामात वेळ गेला. ही घटना ठाणे आणि ऐरोली रेल्वेस्थानकांदरम्यान घडली. या अपघातामुळे रुळाचेही काही प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर लोकल पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.परंतु त्यास अपेक्षेपेक्षा बराच वेळ लागला. सकाळी १०.१५ च्या सुमारास मंदगतीने रेल्वे सुरु झाली. रेल्वेने प्रवाशांना त्याच तिकीट पासवर कुलार्मार्गे हार्बरने प्रवास करण्याची मुभा दिली होती. त्याचा प्रवाशांना दिलासा मिळाला नाही. एनएमएमटी तेजीतगुरुवारी सकाळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर प्रवाशांची होणारी गैरसोय टळावी याकरिता एनएमएमटीच्या वतीने जादा गाड्या सोडण्यात आल्या. घाईच्या वेळेत प्रवाशांनी एनएमएमटीकडे धाव घेतल्याने दिवसभरात त्यांचा धंदा तेजीत झाला. नवी मुंबई परिसरातील स्थानिक आमदार, महापौर, परिवहन समिती सभापती, आयुक्तांच्या निर्देशानुसार परिवहन प्रशासनाने उपाययोजना म्हणून परिवहन उपक्रमाच्या तुर्भे व आसूडगांव या दोन्ही आगारातून २५ अतिरिक्त बसेस सोडल्या. यामुळे ठाणे ते वाशी - बेलापूर मार्गावरील प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचता आले. या अडथळ््याने एनएनएमटीचा गल्लामात्र चांगलाच भरला. टीआरटी यंत्र (ट्रॅक रिलेअींग मशिन)जे रुळांमधीळ स्लीपर्स, खडी रिप्लेस करण्याचे काम करते, त्याचा बेल्ट रुळात अडकून बसला होता. तो निघत नसल्याने रुळ वेगळा करुन तो कटींग करावा लागला. अखेरीस सकाळी १० वाजेनंतर वाहतूक सुरु झाली. त्यामुळे पहाटे ६ ते १० या वेळेत वाहतूक ठप्प होती. - नरेंद्र पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
ट्रान्सहार्बर ४ तास ठप्प, प्रवाशांचे हाल
By admin | Updated: June 19, 2015 02:53 IST