Join us
Daily Top 2Weekly Top 5

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:07 IST

मुंबई : राज्य शिधावाटप नियंत्रक कैलास पगारे आणि सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त चिंतामण जोशी यांच्यासह राज्यातील सहा सनदी ...

मुंबई : राज्य शिधावाटप नियंत्रक कैलास पगारे आणि सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त चिंतामण जोशी यांच्यासह राज्यातील सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी याबाबतचे आदेश जारी केले.

अधिकारी - सध्याचे पद - बदलीचे ठिकाण

आर.एस. जगताप - प्रतीक्षेत - आयुक्त, सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई

कैलास पगारे - शिधावाटप नियंत्रक व संचालक, नागरी पुरवठा - व्यवस्थापकीय संचालक, फिल्मसिटी, मुंबई

के.एच. बागटे - प्रतीक्षेत - शिधावाटप नियंत्रक व संचालक, नागरी पुरवठा

चिंतामण जोशी - आयुक्त, सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई - संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे.

भुवनेश्वरी एस. - मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर स्मार्ट सिटी, नागपूर - महासंचालक, वनामती, नागपूर

प्रदीप चंद्रन - व्यवस्थापकीय संचालक, राज्य खनिकर्म महामंडळ, नागपूर - संचालक, रेशीम महामंडळ, नागपूर