मुंबई : मुंबई महापालिकेच्या सर्व सात परिमंडळातील उपायुक्तांची बदली करण्यात आली आहे़ यापैकी राजेंद्र वळे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागेवर ए विभागाचे सहायक आयुक्त चंद्रशेखर चोरे यांची बढती करण्यात आली आहे़ १ फेब्रुवारीपासून ही बदली लागू होणार आहे़सुधार विभागाचे उपायुक्त डॉ़ किशोर क्षीरसागर यांची परिमंडळ सहामध्ये, तर या परिमंडळातील सुहास करवंदे यांची परिमंडळ १ मध्ये बदली झाली आहे़ परिमंडळ १ चे उपायुक्त विजय बालमवार यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन खात्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे़, तर या खात्याचे विद्यमान उपायुक्त प्रकाश पाटील यांची बदली उपायुक्त विशेष या पदावर झाली आहे़ अतिक्रमण निर्मूलन खात्याचे उपायुक्त बापू पवार यांची बदली कर निर्धारक व संकलन खात्यात, तर या खात्याचे मिलिंद सावंत अतिक्रमण निर्मूलन खात्यात करण्यात आली आहे़ सहायक आयुक्त चोरे यांना बढती देऊन सुधारचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
महापालिका उपायुक्तांच्या बदल्या
By admin | Updated: January 31, 2016 02:15 IST