Join us

मुंबईत रंगली जागतिक शरीरसौष्ठवाची तालीम

By admin | Updated: October 19, 2014 01:00 IST

आगामी डिसेंबर महिन्यात रंगणा:या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवपटूंची रंगीत तालीम नुकतीच पार पडली.

मुंबई : आगामी डिसेंबर महिन्यात रंगणा:या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवपटूंची रंगीत तालीम नुकतीच पार पडली. या वेळी पुरुष व महिला गटात रंगलेल्या लढतीतून एकूण 48 खेळाडूंनी विजयी कामगिरी केली. बडोदा येथे आगामी रंगणा:या राष्ट्रीय स्पर्धेत हे सर्व खेळाडू महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार असून यातील विजयी खेळाडूंची निवड भारतीय संघात करण्यात येईल, असे आयोजकांनी सांगितले.
इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेने दादर येथील शिवाजी मंदिर शाहू सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धेत प्रेक्षकांनी मोठय़ा प्रमाणात उपस्थिती लावताना स्पर्धेची रंगत वाढवली. पुरुष व महिलांच्या गटात  रंगलेल्या या स्पर्धेत ज्युनियर, मास्टर्स, सिनियर, अॅथलेटिक फिजीक, मॉडेल फिजीक आणि स्पोर्ट फिजीक अशा विविध गटांत मोठी चुरस रंगली. 
महिलांच्या खुल्या गटामध्ये नताशा प्रधान व लीला फड यांनी सहज बाजी मारताना महाराष्ट्र संघात स्थान मिळवले. त्याचवेळी श्वेता राठोरे, अश्विनी वासकर आणि स्टेफी डिसूझा यांनी महिलांच्या फिटनेस फिजीक गटात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय स्थानावर कब्जा केला.
पुरुषांच्या सिनियर गटाच्या 1क्क् पेक्षा अधिक वजनी गटात गणोश उरणकरने अपेक्षित निकाल लावताना बाजी मारली. तसेच दीपक त्रिपाठी आणि संग्राम चौगुले यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान मिळवले. 85-9क् किलो वजनी गटात सर्वाची नजर असलेल्या सुमीत जाधवने आपल्या लौकिकानुसार उत्कृष्ट प्रदर्शन करताना प्रथम स्थान काबीज केले. तर अमित वाघमारे, बी. महेश्वरन आणि सागर माळी यांनीदेखील सर्वाचे लक्ष वेधून घेतले. 
पुरुष मास्टर गटाच्या 6क् वर्षावरील वयोगटात अनुभवी मनोहर हिरे यांनी सर्वाची मने जिंकताना एकहाती बाजी मारली.  तर ज्युनियर्स गटाच्या 8क् वजनी गटामध्ये वैभव व्हांगडे आणि नागेश सुतार यांनी सहजपणो बाजी मारली. (क्रीडा प्रतिनिधी)
 
इतर निकाल :
मास्टर्स गट :
च्8क् किलो वजनीगट : अजय गोळे, रवी पुजारी; 8क् पेक्षा अधिक वजनीगट : विराज सरमाळकर; 5क्-6क् वयोगट : विवेक बागेवाडी.
ज्युनियर्स गट :
च्7क् किलोगट : राहुल डोईफोडे
सिनियर गट :
च्6क् किलोगट : अरुण पाटील, सुनील सकपाळ; 65 किलोगट : नितीन म्हात्रे; 7क् किलोगट : श्रीनिवास वास्के; 75 किलोगट : संदीप कडू, क्रेग सिक्वेरा, स्वप्निल नरवडकर; 8क् किलोगट : चंद्रशेखर पवार, सागर कातुर्डे, आशिष साखरकर; 1क्क् किलोगट: जगदीश लाड, अमित पाटील, देवेंद्र भोईर, अक्षय मोगरकर.
स्पोर्ट्स फिजीक्स गट :
च्मुस्तफा अहमद, गौरव यादव, प्रतीक सोनावणो, साहिल नांदगावकर, विशाल शेट्टी, मोहन जगदानकर, पवेश काळीवाडा, रोशन घारे, ज्ञानेश्वर सोनावणो आणि अभिजित सिंग पवार.
अॅथलेटिक गट :
च्अक्षय तावडे, श्रीपाद पाटकर, स्वदेश मोहिते, कुश सुवर्णा, रायन केन्नेली, मयुरेश नानेकर, नवाफ दादरकर, जुनैद काळीवाडा आणि चेतन थिंगालय.