Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षणार्थी कॉन्स्टेबलला अटक, तरुणीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 07:15 IST

मैत्रिणीने प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी, एका प्रशिक्षणार्थी पोलीस कॉन्स्टेबलला अंधेरी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली.

मुंबई : मैत्रिणीने प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी, एका प्रशिक्षणार्थी पोलीस कॉन्स्टेबलला अंधेरी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. सिद्धेश शरद सावंत (वय २३) असे त्याचे नाव असून, तो रेल्वे पोलीस दलात भरती असून, सध्या सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत होता. विशेष म्हणजे, त्याने तरुणीचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी ट्रेनिंग सेंटरमधील संगणकाचा वापर केल्याचे तपासातून समोर आले आहे.सिद्धेश हा अंधेरीत राहणारा आहे. त्याचे परिसरातील सीमा (बदलले नाव) या तरुणीशी प्रेमसंबंध होते. तिने नुकतेच पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून, काही कारणावरून त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. सीमाने त्याच्याशी संबंध तोडून टाकले होते. त्यामुळे चिडलेल्या सिद्धेशने बदला घेण्याचे ठरवत, सीमाचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंट हॅक केले. त्यातून तिचे काही अश्लील फोटो व स्वत:सोबतचे व्हिडीओ तिच्या मित्रमैत्रिणींना पाठविले. सीमाच्या मैत्रिणीने हा प्रकार तिला सांगितल्यानंतर, तिने अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या तपासात हे कृत्य सिद्धेशने केल्याचे स्पष्ट झाले. संबंधित फोटो आणि व्हिडीओ पाठविले जाणाऱ्या संगणकाचा आयपी अ‍ॅड्रेस पोलिसांना मिळाल्यानंतर, तो संगणक सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, अंधेरी पोलिसांचे एक पथक सोलापूरला जाऊन, शुक्रवारी रात्री ट्रेनिंग सेंटरमधून त्यांनी सिद्धेशला अटक केली.