Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा १० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:06 IST

मुंबई : कोरोनाकाळात रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले होते. आता संचारबंदीत शिथिलता ...

मुंबई : कोरोनाकाळात रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले होते. आता संचारबंदीत शिथिलता मिळाल्याने १६ जूनपासून हे तिकीट पुन्हा १० रुपयांचेच करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या आप्तांना दिलासा मिळाला आहे.

प्लॅटफाॅर्म तिकिटासाठी ११ मार्चपासून ५० रुपये मोजावे लागत होते. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाविषयी सामान्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. अखेर चार महिन्यांनंतर प्लॅटफाॅर्म तिकिटासाठी पुन्हा १० रुपयेच द्यावे लागतील. महागड्या तिकिटामुळे रेल्वे फलाटावर जाण्याऐवजी बाहेरूनच नातेवाईक, आप्तांना निरोप दिला जात होता. आता प्लॅटफॉर्म तिकीटचे दर कमी झाल्याने फलाटावर प्रवाशांएवढीच त्यांना सोडणाऱ्या आप्तांची राहणार आहे.

कोरोनाकाळात बंद झालेल्या रेल्वे गाड्या पुन्हा सुरू होत असल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कोरोनाकाळात विशेष रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या. त्या सुरू कराव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे.

प्लॅटफॉर्म तिकीट विक्री

वर्ष /तिकीट/ उत्पन्न

२०१९ -२० / ९९३६८७०/९९३६८७००

२०२०-२१/२३६५४७/१०५६६५९०

२०२१ -२२/७३४४५/३६३४१७०

एकूण /१०२४६८६२/११३५६९४६०

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्मचे तिकीट दर ५० रुपये करण्यात आले होते. मात्र, कोरोना रुग्ण संख्येत घट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्म तिकीटसाठी आता १६ जूनपासून पुन्हा १० रुपये घेण्यात येत आहेत, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.