Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकलमध्ये प्रवाशांना व्यापाऱ्यांचा त्रास

By admin | Updated: May 31, 2016 02:34 IST

डहाणू ते विरार दरम्यान शटल व पॅसेंजर गाड्यांमध्ये व्यापाऱ्यांचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहेत. हे व्यापारी या गाड्यांमधून लगेज चुकवून मालाचे बोजे लगेज

पालघर/सफाळे : डहाणू ते विरार दरम्यान शटल व पॅसेंजर गाड्यांमध्ये व्यापाऱ्यांचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहेत. हे व्यापारी या गाड्यांमधून लगेज चुकवून मालाचे बोजे लगेज बोगीमध्ये न ठेवता सर्रास सर्वसाधारण प्रवासी डब्यात ठेवतात. त्याचा त्रास प्रवाशांना होतो.या गाड्या स्टेशनवर लागताच सामान्य प्रवाशांना धक्काबुक्की करून ते हे बोजे दरवाज्यामध्येच ठेवतात. त्यामुळे प्रवाशांना चढउतर करताना अडचण होते. काही तर आपले बोजे शौचालये व सीटखाली व सीटच्या वर असलेल्या अप्पर बर्थवर ठेवतात. त्याला प्रवाशांनी विरोध केल्यास त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्कीही ते करतात. रेल्वे प्रशासनास ही बाब दिसत नाही का? किंवा हे बोजेवाले रेल्वेचे हजारो रुपयांचे उत्पन्न बुडवून नुकसान करतात. स्टेशनवर कर्तव्य बजावत असणारी सुरक्षा यंत्रणेलाही प्रवाशांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष देत नाही.प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न या सुरक्षा यंत्रणेवर असताना या बोजेवाल्यांना कोणीच अडकाठी करीत नाही. अशा बोजातून जर स्फोटके अथवा बॉम्ब गाडीत ठेवून काही घातपात झाला तर त्याची जबाबदारी कुणावर असेल? असा प्रश्न प्रवाशांमध्ये चर्चिला जातो आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे जवान त्यांचे हितसंबंध गुंतल्यामुळे तर त्याकडे दुर्लक्ष करीत नसावेत ना? असेही चर्चिले जाते आहे.