Join us

सागवानची अवैध वाहतूक करणारा टेम्पो उलटला

By admin | Updated: May 2, 2015 22:53 IST

तालुक्यातील मांडवा गावाजवळील लहान पुलाखाली सागवानची अवैध वाहतूक करताना गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास एमएच ४८

वाडा : तालुक्यातील मांडवा गावाजवळील लहान पुलाखाली सागवानची अवैध वाहतूक करताना गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास एमएच ४८ श्री २०५८ क्रमांकाचा पीकअप उलटला. यात लाकडाचे २१ ओंडके असून माल व टेम्पो वनविभागाने ताब्यात घेतला आहे. अपघातानंतर गाडीला तिथेच ठेवून चालक व अन्य फरार झाले. ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात येतात त्यांनी वनविभागाला माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून टेम्पोसह सागाचे ओंडके जप्त केले. हा माल आणि गाडी नेमकी कुठली, याबाबत वनविभागाने चौकशी सुरु केली आहे. जंगलतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष आहे. (वार्ताहर)