Join us  

वर्सोव्यातील वाहतूक कोंडी फुटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 8:46 PM

ओशिवरा पूल बंद असल्याने वर्सोवाच्या नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते ही वस्तुस्थिती आहे.

ठळक मुद्देवर्सोवा येथील वाहतूक कोंडी दूर होऊन अनेक प्रश्न मार्गी लागले अशी माहिती आमदार डॉ.लव्हेकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.विरा देसाई मार्गावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण बांधण्याचा निर्णय झाला आहे.

मुंबई - 8 जून 2014 साली वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर मुंबईतील पहिली मेट्रो सुरू झाली.मात्र डी. एन.नगर ते दहिसर,स्वामी समर्थ नगर ते कांजूर मार्ग या मार्गावर सुरू असलेली मेट्रोची कामे,जेव्हीएलआर रस्त्याचे रखडलेले विस्तारीकरण आणि अनेक ठिकाणी असलेले बॉटलनेक यामुळे वर्सोवा विधानसभा मतदार संघातील सुमारे 2 लाख 97 हजार नागरिकांना नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यातच ओशिवरा पूल बंद असल्याने वर्सोवाच्या नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते ही वस्तुस्थिती आहे.

 यावर मार्ग काढण्यासाठी येथून 2014 साली भाजपाच्या आमदार म्हणून निवडून आल्यानंतर डॉ.भारती लव्हेकर या सातत्याने प्रयत्नशील आहेत.येथील वाहतूक कोंडी व चार पुलांची निर्मिती लवकर करणे अन्य समस्या दूर करण्यासाठी आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी नुकतीच पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या दालनात नुकतीच महत्वाची बैठक आयोजित केली होती.या बैठकीत पालिका आयुक्तांनी अनेक सकारत्मक निर्णय घेतल्याने वर्सोवा येथील वाहतूक कोंडी दूर होऊन अनेक प्रश्न मार्गी लागले अशी माहिती आमदार डॉ.लव्हेकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.

या बैठकीत सात बंगला येथील केंद्रीय मत्स्यकी विद्यालय मार्गे यारी रोड कडे जाणाऱ्या रस्ता रुंदीकरणात सुंदरवाडी  झोपडपट्टी आहे.येथील 28 झोपडयांपैकी 5 झोपड्यांना पालिकेने शिफ्टिंग यापूर्वी दिले होते.आता उर्वरित 23 झोपड्यांना लवकर शिफ्टिंग देण्याचा निर्णय या बैठकीत झाला.तर केंद्रीय मत्स्यकी संस्थेची रस्ता रुंदीकरणात येणारी संरक्षक भिंत तोडण्यात येईल.पालिका स्वखर्चाने नवीन भिंत बांधून देईल असा महत्वाचा निर्णय झाला.त्यामुळे येथील बॉटलनेक दूर होऊन 120 फुटांचा रस्ता होणार असल्याने येथील वाहतूक कोंडी कमी होईल असा विश्वास त्यांनी आमदार लव्हेकर यांनी व्यक्त केला.

वर्सोव्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी इन्फिनिटी मॉल ते एसव्हीरोड मार्गेजेव्हीएलआर रस्त्याच्या रखडलेल्या विस्तारीकरणात रखडलेले 3 एसआरए प्रकल्प मार्गी लावणे,या मार्गात येणारी पालिका व उपनगर जिल्ह्याधिकारी,म्हाडा  यांच्या मालकीचे असलेले अडथळे दूर करण्यासाठी लवकरच 120 फुटांचा डीपी रस्ता पालिकेकडे हस्तांतरित करणे ,तसेच पालिका प्रशासनाबरोबर एसआरए आणि उपनगर जिल्ह्याधिकारी,म्हाडा,डीपी यांची संयुक्त बैठक बोलवण्याचा निर्णय झाल्याची माहिती लव्हेकर त्यांनी दिली.येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अमरनाथ टॉवर ते लोखंडवाला बँक रोड, केंद्रीय मत्स्यकी संस्था ते एस.व्ही.पी.नगर ते अमरनाथ टॉवर आणि वर्सोवा ते मढ हे चार पूल लवकर मार्गी लावण्याचा आणि पर्यावरण खात्याची परवानगी लवकर आणण्याचा निर्णय झाला अशी माहिती लव्हेकर यांनी दिली.

विरा देसाई मार्गावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण बांधण्याचा निर्णय झाला आहे. तसेच ओशिवरा मॅटरनिटी होम लवकर मार्गी लावणे,अंधेरी क्रीडा संकुलात वर्सोवा येथील नाट्यप्रेमी रसिकांसाठी नाट्य गृहाचे काम लवकर मार्गी लावण्याची आग्रही मागण्या देखिल त्यांनी आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे त्यांनी केल्या. वर्सोवा स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू असून येथील बोहरी समाजासाठी 200 बरीज दफनभूमी लवकर बांधण्यात यावी अशी मागणी लव्हेकर यांनी यावेळी केली.

या बैठकीला प्रभाग क्रमांक 60 चे भाजपा नगरसेवक योगिराज दाभाडकर, प्रभाग क्रमांक 63 च्या भाजपा नगरसेविका रंजना पाटील, वर्सोवा भाजपा अध्यक्ष पंकज भावे, परिमंडळ 4 चे पालिका उपायुक्त किरण आरचरेकर, के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड, उप जिल्हाधिकारी काळे आणि वर्सोवा येथील नागरिक उपस्थित होते. एकंदरीत पालिका आयुक्तांबरोबर झालेल्या या महत्वाच्या बैठकीत अनेक निर्णय आयुक्तांनी मान्य केल्याने येथील वाहतूक कोंडी व अन्य प्रश्न लवकर मार्गी लागतील असा ठाम विश्वास आमदार लव्हेकर यांनी शेवटी व्यक्त केला.

टॅग्स :वाहतूक कोंडीमुंबईअंधेरीनगर पालिका