Join us

वाहतूक पोलीस २०२०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:07 IST

मुंबई महापालिका, वाहतूक पोलीस आणि ‘ब्लुमबर्ग’च्या ग्लोबल रोड सेफ्टी अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात न्यूयॉर्क ‘टाइम्स स्क्वेअर’ ...

मुंबई महापालिका, वाहतूक पोलीस आणि ‘ब्लुमबर्ग’च्या ग्लोबल रोड सेफ्टी अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात न्यूयॉर्क ‘टाइम्स स्क्वेअर’ प्रयोग राबविण्यात आला होता. टाइम्स स्क्वेअर प्रयोगात अपघातांच्या शक्यतेचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने पादचारी सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यात आले. वाहतूककोंडी होत असल्यामुळे हा प्रयोग केवळ स्थगित करण्यात आला; परंतु याबाबत येत्या काळात काही बदल करून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबत चर्चा सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.

सिग्नलवर सतत हॉर्न वाजविणाऱ्यांना आवाज बंद

दिल्ली, बंगलोर असो किंवा मुंबई, सर्वच ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या आहे. सिग्नल लागल्यानंतर काही सेकंदही थांबण्याचा वाहनचालकांना संयम नसतो. ते जोरजोरात हॉर्न वाजवायला सुरू करतात; पण मुंबई पोलिसांनी अनोखा उपक्रम सुरू केला होता. मुंबई पोलिसांनी सिग्नल परिसरात आवाज मोजणारी यंत्रणा लावली आहे. याबद्दलचा एक व्हिडिओ मुंबई पोलिसांनी ट्विट केला आहे. यामध्ये सिग्नल परिसरात असणाऱ्या दुभाजकावर असणारी यंत्रणा हॉर्नच्या आवाजाची तीव्रता मोजणारे डेसिबल मीटर बसवण्यात येणार आहे. वाहनचालकांकडून वाजविण्यात येणाऱ्या हॉर्नची तीव्रता ८५ डेसिबलपेक्षा जास्त झाली तर सिग्नल रिसेट होतो. त्यामुळे वाहनचालकांना सिग्नलवर जास्त वेळ थांबावं लागणार आहे.