Join us
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:08 IST

मुंबई : चर्चगेट ते अंधेरीदरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे अपघात होत असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक ...

मुंबई : चर्चगेट ते अंधेरीदरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे अपघात होत असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. दीड ते दोन तास वाहतूक कोंडीत जात आहेत. त्यामुळे खड्डे दुरुस्त केले जावेत, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.

__

अनधिकृत फेरीवाला क्षेत्र बंद करा

मुंबई : अनधिकृत पद्धतीने रस्त्यावर विक्री करणाऱ्या बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे पालिकेच्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला. असे प्रकार मुंबईतही होण्याची शक्यता असून, मुंबईत विविध ठिकाणी असलेले अनधिकृत फेरीवाला क्षेत्र बंद करा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

-

फूटपाथखालील नाल्याची झाकणे बंद करा

मुंबई : चेंबूर पश्चिम येथे लोकमान्य टिळक पालिका शाळेसमोर फुटपाथखाली असलेल्या नाल्याचे झाकण उघडे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी पडून अपघात होण्याचा धोका आहे. त्यामुळे तात्काळ झाकण बसविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

---/

दुचाकीचालकांना लगाम लावा

मुंबई : पूर्व मुक्त मार्गावरून दुचाकी चालविण्यास परवानगी नाही; परंतु अनेक दुचाकीस्वार येथून भरधाव वेगाने जात आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत, तसेच अनेकदा लुटीचे प्रकार घडत आहेत. या दुचाकीस्वारांना लगाम लावा, अशी मागणी रहिवासी करत आहेत.