Join us

डहाणूत दोन तास वाहतूक ठप्प

By admin | Updated: August 26, 2014 01:34 IST

नगरपरिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आज सकाळी सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाल्याने वाहनचालक, विद्यार्थी तसेच नागरिकांचे हाल झाले

डहाणू : नगरपरिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आज सकाळी सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाल्याने वाहनचालक, विद्यार्थी तसेच नागरिकांचे हाल झाले.डहाणू नगरपरिषद हद्दीतील रेल्वे ओव्हरब्रिज (मल्याण) खाली एका झाडाची फांदी कापण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सकाळच्या सुमारास काम हाती घेतल्याने डहाणू-कासा राज्यमार्गावरील पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली. डहाणू - कासा राज्यमार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ पाहता पालिकेने हे काम रात्रीच्यावेळी करणे गरजेचे असताना देखील सकाळच्या वेळेस कर्मचाऱ्यांनी काम सुरू केल्याने हजारो वाहनांची प्रचंड गर्दी होऊन वाहतूक ठप्प झाली. या प्रकाराने शाळेत जाणारे विद्यार्थी, सोमवारी आठवडा बाजाराकडे जाणारे दुकानदार तसेच डहाणूहून चारोटी, कासा शिवाय मुंबई-अहमदाबाद महामार्गाकडे जाणारे नागरिक अडकून पडले.दरम्यान, डहाणू पालिका प्रशासनाने पुरेशा प्रमाणात कर्मचारी, वाहतूक पोलीस तसेच वेळेचे योग्य नियोजन न केल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊन सुमारे दोन तास रस्ता बंद झाला होता. विशेष म्हणजे सागरनाक्यापासून सरावलीपर्यंत हजारो वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. (वार्ताहर)