Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात दोनशे होमगार्ड सोडविणार वाहतूककोंडी

By admin | Updated: May 30, 2015 22:29 IST

वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांची वाढती संख्या व अरुंद रस्त्यामुळे वाहतूककोंडी दिवसेंदिवस डोकेवर काढते.यातून सुरळीत आणि सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक शाखेबरोबर २०० होमगार्ड लवकरच रस्त्यावर दिसणार आहेत

पंकज रोडेकर ल्ल ठाणेवाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांची वाढती संख्या व अरुंद रस्त्यामुळे वाहतूककोंडी दिवसेंदिवस डोकेवर काढते.यातून सुरळीत आणि सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक शाखेबरोबर २०० होमगार्ड लवकरच रस्त्यावर दिसणार आहेत. होमगार्ड मिळावे अशी मागणी ठाणे शहर पोलिसांनी शासनाकडे केली होती. त्याला शासनाने हिरवा कंदील दिला आहे. ते मिळाल्यावर त्यांना वाहतूककोंडी सोडवण्याचे त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.ठाणे आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे, भिंवडी-निजामपूरा, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महापालिका व कुळगांव-बदलापू,अंबरनाथ नगरपालिका अशा एकू ण ६ स्थानिक स्वराज्य संस्थांची हद्द समाविष्ट आहे. तेथील वाहतूक सोडवण्यासाठी एकूण २२ वाहतूक उपशाखा असून त्यासाठी एकूण ७६५ मंजूर मनुष्यबळ आहे. सद्यस्थितीत ६८९ कर्मचारी वाहतूक शाखेकडे आहेत. मात्र,ते कमी आहेत. त्यातच वाढते नागरिकरण आणि वाहने,अरुंद वखराब रस्ते,त्यांची दुरुस्ती, तसेच शहरात ये - जा करणाऱ्या बेस्ट, नवी मुंबई, मिरा-भार्इंदर, वसई-विरार यास्थानिक प्राधिकरणाची सार्वजनिक वाहतूक, त्याचबरोबर खाजगी कंपन्या,मोठ्या नागरी वसाहतींची स्वंतत्र बससेवा, रिक्षा, टॅक्सी आणि महामार्गावरुन दिवसरात्र होणारी जड-अवजड वाहनांची वर्दळ, शहरातील वाढत्या मॉलच्या संख्येमुळे तसेच तेथील अपुऱ्या पार्र्किं ग व्यवस्थेमुळे मुख्य आणि सर्व्हिस रोडवरील अनधिकृत पार्र्किं ग,यासर्वच गोष्टींमुळे वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटील झाली आहे. कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर महापालिके ने ही समस्या सोडवण्यासाठी पोलिसांच्या मदतीस प्रत्येकी २५ ट्रॅफिक वॉर्डन दिले आहेत. त्याच धर्तीवर ठाण्यातही २०० तर कल्याण आणखी १०० ट्रॅफिक वॉर्डनची गरज असल्याने या दोन्ही महापालिकांच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यानुसार केडीएमसीने ५० वॉर्डन देण्याचे मंजूर केले आहे. मात्र, ठामपाकडून अद्यापही वॉर्डन देण्याबाबतनिर्णय झालेला नाही. याचदरम्यान,पोलीस प्रशासनाने शासनाकडे २०० होमगार्ड मिळावेत अशी मागणी केली होती. ती मान्य झाली आहे. त्यामुळे सण, निवडणुका या कार्यक्रमासाठी पोलिसांच्या मदतीला असलेले होमगार्ड आता वाहतूककोंडी सोडवताना दिसतील.वाहतूककोंडीची ठिकाणेठाणे तीन हात नाका, स्टेशन, नौपाडा परिसर, कापूरबावडी सर्कल, कॅडबरी, मिराताई ठाकरे चौक, ब्रह्मांड सर्कल, गायमुख, स्टेशन,पोष्ट हाऊस, शिवाजी चौक (कळवा) कल्याणातील दुर्गाडी, शिवाजी चौक, कल्याण स्टेशन, डोंबिवली स्टेशन आदीसुरक्षित आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था ठेवण्यासाठी होमगार्ड मिळावेत अशी मागणी केली होती. त्याला मंजुरी मिळाली असून त्यानुसार मिळणाऱ्या होमगार्डंना वाहतुकीचे प्रशिक्षण दिली जाणार आहे. - व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण, सह पोलीस आयुक्त, ठाणे शहर