Join us  

तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलची वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 1:38 PM

तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलला होणारा विद्युत पुरवठा बंद झाल्याने सोमवारी सकाळी ऐन गर्दीच्या काळात मोनोरेल ठप्प झाली.

मुंबई : तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलला होणारा विद्युत पुरवठा बंद झाल्याने सोमवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळेत मोनोरेल ठप्प झाली.

चेंबूर वाशीनाका आणि भारत पेट्रोलियम दरम्यान मोनोरेल बंद पडली. वाशी नाका परिसरात मोनोरेल मध्येच बंद झाल्याने मोनोरेलमधील सर्व प्रवासी अडकले होते. मात्र मोनोरेल बंद पडल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. जवानांनी मोनोरेलच्या डब्यांना शिडी लावून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

ऐन गर्दीच्या वेळेत मोनोरेलची वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागले. आठवड्याच्या पहिल्याच सोमवारी तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलची वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना प्रवासासाठी विविध पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. 

टॅग्स :मोनो रेल्वेमुंबई