Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाशी टोलनाक्यावर वाहतूक कोंडी

By admin | Updated: October 19, 2014 01:18 IST

टोल दरवाढीने वाहनाचालकांची डोकेदुखी वाढवली आहे. टोलनाक्यावर सुटय़ा पैशाच्या मागणीमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

नवी मुंबई : टोल दरवाढीने वाहनाचालकांची डोकेदुखी वाढवली आहे. टोलनाक्यावर सुटय़ा पैशाच्या मागणीमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. सुटय़ा पैशांच्या तुटवडय़ामुळे वाशी टोलनाक्यावर रोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. परिणामी वाहतूक पोलिसांवरील नियोजनचा भार वाढला आहे.
वाशी येथील टोलनाक्यावर टोलदरवाढीनंतर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. टोलच्या दरात 5 रुपयांची वाढ होऊन नवीन दर 35 रुपये झाले आहेत. टोल भरताना बहुतांश वाहनधारकांकडे सुट्टे 5 रुपये नसल्याने या ठिकाणी गैरसोय होत आहे. त्याकरीता सुटय़ा पैशांची शोधाशोध वाहनधारकांना करावी लागत आहे. टोल कर्मचा:यांकडेही चिल्लरचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे टोलचा भरणा करण्यास वाहनधारकांना विलंब होत आहे. ज्यामुळे सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्यावेळी टोल नाक्यावर वाहनांच्या लांब रांगा लागत आहेत. गेल्या आठवडाभरापासून या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी होत आहे. ज्यामुळे वाशी पुलावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. शनिवारी या टोल नाक्यावर अशीच वाहतूक कोंडी झाली होती. रविवारच्या सुटीचा बेत आखून अनेक जण मुंबईबाहेर धाव घेत होते. त्यामुळे मुंबई पुण्याला जोडणा:या या मार्गावर खाजगी वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. (प्रतिनिधी)