Join us

मुंब्रा-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी

By admin | Updated: February 24, 2015 22:15 IST

मुंब्रा-पनवेल महामार्गावरील नावडे फाटा ते फुडलँड कंपनी दरम्यान सकाळी ११ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली

तळोजा : मुंब्रा-पनवेल महामार्गावरील नावडे फाटा ते फुडलँड कंपनी दरम्यान सकाळी ११ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली ही कोडी तासभर होती. त्यामुळे शालेय विद्यार्थी, कामगारवर्गाचे हाल झाले. या मार्गावर रोजच वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. तळोजा एमआयडीसी, मुंब्रा मागर्गे कल्याण, डोंबिवली येथे ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्यामुळे या मार्गावर वर्दळ असते. नियोजनाअभावी या मार्गावर अशा प्रकारे वाहतूक कोंडी होत असलयाचे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे म्हणणे आहे.संबंधीत वाहतूक यंत्रणेचे बळ कमी पडत असल्याने अवजड वाहन चालक बेशिस्टपणे वाहने चालवून वाहतूक कोंडी निमंत्रण देत असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेकदा अवजड वाहने रस्त्यावर वळण घेताना भरधाव वेगाने येतात. त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात होतात. याबाबत वाहनचालकांकडून अनेकदा तक्रारही करण्यात आली आहे. मात्र वाहतूक पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येते. याठिकाणी अवजड वाहनांना दिवसा प्रवेश देऊ नये, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर पनवेलच्या दिशेने जाताना फुडलँड कंपनी सर्कलवरून कळंबोली व पोलीस आयुक्तालयाकडे जाणाऱ्या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर अवजड वाहन चालक करत असून बेशिस्तपणे रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहने उभी केलीली असतात. यावर अंकुश लावण्यात आला तर ही समस्या लवकरच सुटून वाहतूक कोंडीची समस्या सुटू शकते. (वार्ताहर)