Join us

वाशीतील टॉय ट्रेन आजपासून धावणार

By admin | Updated: November 13, 2014 22:51 IST

वाशी येथील मिनी सिशोअर येथील मीनाताई ठाकरे उद्यानातील टॉय ट्रेन उद्यापासून पुन्हा धावणार आहे. मागील काही महिन्यांपासून ही ट्रेन बंद पडली होती.

नवी मुंबई :  वाशी येथील मिनी सिशोअर येथील मीनाताई ठाकरे उद्यानातील टॉय ट्रेन उद्यापासून पुन्हा धावणार आहे.  मागील काही महिन्यांपासून ही ट्रेन बंद पडली होती. याबाबत लोकमतमध्ये वृत्तही प्रसिध्द झाले होते. याची दखल घेत आणि बालदिनाचे औचित्य साधून ती पुन्हा सुरू करण्यात येत आहे. 
वाशी आणि परिसरातील बच्चे कंपनीसाठी महापालिकेच्या माध्यमातून मिनी सिशोअर परिसरात ही टॉय ट्रेन सुरू करण्यात आली होती. मात्र मागील काही महिन्यांपासून ही ट्रेन बंद असल्याचे दिसून आले आहे. ऐन दिवाळीच्या सुट्टीत सुध्दा ही ट्रेन बंद राहिल्याने बच्चे कंपनीचा चांगलाच हिरमोड झाला होता. यासंदर्भात लोकमतमध्ये सविस्तर वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत महापालिकेने या ट्रेनची डागडुजी सुरू केली आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले असून बालदिनाच्या मुहूर्तावर टॉय ट्रेन बच्चे कंपनीसाठी उपलब्ध आहे. महापालिकेकडून तिकिटे विकत घेण्यात आली असून मेळाव्यात सहभागी होणा:या बच्चे कंपनीला  मोफत देण्यात येणार आहे. 
 
बालगोपाळ मेळावा
उद्या बालदिनाचे औचित्य साधून स्थानिक नगरसेविका प्रणाली लाड यांच्या वतीने मिनी सिशोअर परिसरात बालगोपाळ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुलांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, घोडागाडी आदींची सोय करण्यात आली आहे. तसेच बालगोपाळांना टॉय ट्रेनची उद्या मोफत सवारी करण्याची संधी प्राप्त होणार आहे.