Join us

मुलुंड येथे बसखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

By admin | Updated: May 29, 2014 00:27 IST

मुलुंड येथे मनोज उर्फ काल्या (२७) या पादचारी तरुणाचा काल रात्री बेस्ट बसच्या मागील चाकाखाली चिरडून मृत्यू झाला.

मुंबई : मुलुंड येथे मनोज उर्फ काल्या (२७) या पादचारी तरुणाचा काल रात्री बेस्ट बसच्या मागील चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. याप्रकरणी बसचालक लक्ष्मण पवार (४२) याला मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे. मुलुंडमध्ये फुटपाथवर राहाणारा मनोज मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आर. पी. रोड वरील शौचालयातून बाहेर पडला. त्याचदरम्यान वळण घेत असलेल्या बसच्या मागच्या चाकाखाली तो चिरडला गेला. रस्त्यावर रहदारीही कमी असल्याने बसखाली तरुण आल्याचे बसचालकालाही समजले नाही. त्यामुळे तो तेथून निघून गेला. मुलुंड पोलिसांनी मनोजला मुलुंड अग्रवाल रुग्णालयात नेले. मात्र दाखल करण्यापूर्वी तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसतपासात ४२२ क्रमांकाच्या एसी बसखाली हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले. ही बस मुलुंड चेकनाका येथून अंधेरी येथे जात होती. याप्रकरणी बसचालक लक्ष्मण पवार याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्‘ात अटक करण्यात आल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी दिली. मनोज हा मुळचा बिहारचा असून १५ वर्षांपासून तो घर सोडून मुलुंडमध्ये फुटपाथवर राहतो. एका कॅटरर्सकडे तो कामाला असल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी दिली.