Join us

केडीएमसी कर्मचा:यांना अखेर 12 हजार 251 रूपये सानुग्रह अनुदान

By admin | Updated: September 5, 2014 23:16 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कर्मचा-यांना यंदा दिवाळीचे सानुग्रह अनुदान म्हणून 12 हजार 251 रूपये देण्याची घोषणा शुक्रवारी महापौर कल्याणी पाटील यांनी केली.

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कर्मचा-यांना यंदा दिवाळीचे सानुग्रह अनुदान म्हणून 12 हजार 251 रूपये देण्याची घोषणा शुक्रवारी महापौर कल्याणी पाटील यांनी केली. दिवाळीपूर्वी 15 ऑक्टोबर्पयत कर्मचा:यांच्या बँक खात्यात हे सानुग्रह अनुदान जमा झाले पाहिजेत, असे आदेश पाटील यांनी प्रशासनाला दिले. 
केडीएमसीतील म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना या मान्यताप्राप्त युनियनने 21 हजार सानुग्रह अनुदान मिळावे अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. यासंदर्भात महापौर पाटील यांनी बोलाविलेल्या विशेष बैठकीत 12 हजार 251 रूपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला. महापालिकेचे सुमारे साडेपाच हजार कर्मचारी असून या सानुग्रह अनुदानासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात 5 कोटी 97 लाखाची तरतूद केली आहे. परिवहन, शिक्षण मंडळ आणि बालवाडी शिक्षिका यांनाही हे सानुग्रह अनुदान मिळेल. गेल्या वर्षी कर्मचा-यांना 11 हजार रूपये सानुग्रह अनुदान दिले होते. (प्रतिनिधी) 
 
च्महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचे कारण देऊन महासभेने कर्मचा:यांना 1क्,5क्क्  दिवाळी सानुग्रह अनुदानाला देण्याला मान्यता दिली आहे.  गेल्या वर्षीही इतकेच सानुग्रह अनुदान दिले होते.  यामुळे यावर कर्मचारी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. याचा लाभ पालिकेच्या 27क्क् कर्मचा:यांना मिळणार असून पालिकेवर तीन कोटी पेक्षा जास्त आर्थिक बोजा पडणार असल्याची माहिती पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी दिली.