लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात मंगळवारी दिवसभरात ५ लाख ५८ हजार ६३९ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर आतापर्यंत एकूण २ कोटी ८६ लाख ४५ हजार ७५३ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील एकूण ३७ लाख ८८ हजार ५५९ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला, तर २ लाख ३७ हजार ४८८ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे.
राज्यात १२ लाख ५४ हजार ५७७ आराेग्य कर्मचाऱ्यांनी पहिला तर ८ लाख २० हजार ११ आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला. २० लाख ७१ हजार ११८ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी पहिला, तर ८ लाख ७४ हजार ८१२ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला. राज्यात ४५हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ५९ लाख २२ हजार ७५८ लाभार्थ्यांनी पहिला तर ३६ लाख ७६ हजार ४३० लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
जिल्हा - लाभार्थी
मुंबई ४८,४३,०३७
पुणे ३८,७५,२१६
ठाणे २२,६९,१९७
नागपूर १४,६९,१५६
कोल्हापूर १२,८५,७८६
----------------------------------