Join us
Daily Top 2Weekly Top 5

सख्या काकानेच केला पुतणीवर अत्याचार

By admin | Updated: June 7, 2014 02:34 IST

जीवे ठार मारण्याची धमकी देत तीन महिन्यांपासून आपल्या सख्या अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करणारा तिचा काका शफी याला राबोडी पोलिसांनी अटक केली आहे.

ठाणे : जीवे ठार मारण्याची धमकी देत तीन महिन्यांपासून आपल्या सख्या अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करणारा तिचा काका शफी याला राबोडी पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील राबोडी परिसरात राहणार्‍या अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्र ारीनुसार, २८ मार्च २०१४ रोजी सायंकाळी पीडित मुलगी शिकवणीकरिता जात असताना तिचा काका शफीने तिला कुठे जाते, असे बोलून, मी तुला रिक्षाने शिकवणीला सोडतो, असे सांगितले. दरम्यान, त्याने तिला रिक्षात बसून कळवा मार्गे मुंब्य्रातील एका हॉटेलमध्ये नेले आणि तेथे पिडीत मुलीला चापटीने मारहाण करून तिच्यावर जबरीने अत्याचार केला. हा प्रकार जर कोणाला सांगितलास तर जिवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. त्यानंतर आरोपी शफीने थेट पिडीत मुलीच्या घरी येऊन तिला धमकावून पुन्हा मुंब्य्रात नेऊन अत्याचार केला. बदनामी आणि जिवाच्या भीतीने पीडित मुलगी प्रतिकार करीत नसल्याने त्याने तिला माथेरानला फिरायला नेतो म्हणून पीडित मुलीसह तिच्या दोन लहान भावांना घेऊन गेला. तेथे भाड्याच्या खोलीत मुलीवर अत्याचार केला. दिवसेंदिवस वाढत्या अत्याचाराला कंटाळलेल्या पिडीत मुलीने शुक्र वारी घडलेल्या सर्व प्रकारची माहिती आपल्या आईला सांगितली. त्यानुसार तिच्या घरच्यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शफीला अटक केले.