Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

By admin | Updated: April 18, 2016 01:37 IST

शहरातील कुर्ला कॅम्प रोड परिसरात राहणाऱ्या १३ आणि ७ वर्षांच्या अल्पवयीन मुलींवर बापाने अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. मुलीच्या आईने मुलीसह विठ्ठलवाडी पोलीस

उल्हासनगर : शहरातील कुर्ला कॅम्प रोड परिसरात राहणाऱ्या १३ आणि ७ वर्षांच्या अल्पवयीन मुलींवर बापाने अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. मुलीच्या आईने मुलीसह विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यांतर्गत पित्याला अटक केली आहे. कुर्ला कॅम्प परिसरात पीडित कुटुंब राहत आहे. वडिलांना दारूचे व्यसन असून हातागाडीचे काम सोडले आहे. आई धुणीभांडी करून कुटुंबाचे पालनपोषण करते. आई कामाला गेल्यावर या अल्पवयीन मुलींना मोबाइलवरील अश्लील चित्रफीत दाखवून वडील त्यांच्यासोबत अश्लील चाळे करीत असे. शुक्रवारी रात्री दोन्ही मुलींना बाथरूममध्ये मोबाइलवरील चित्रफीत दाखवत बळजबरीने अत्याचार केला. घडलेला प्रकार सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.वडिलांच्या भीतीपोटी आईला झालेला प्रकार मुलींनी सांगितला नव्हता. मात्र, मुलींच्या पोटात दुखत असल्याने आईने त्यांच्याकडे विचारणा केली. त्या वेळी मुलींनी झालेला प्रकार सांगितले. पोलिसांनी शनिवारी उशिरा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रविवारी बापाला अटक केली आहे. यापूर्वी दोन ते तीन वेळा मुलींसोबत असा प्रकार केल्याची कबुली पित्याने पोलिसांना दिली, अशी माहिती तपास अधिकारी पी.पी. चौधरी यांनी दिली. (प्रतिनिधी)आईने मुलींसह विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात जाऊन झालेला प्रकार सांगितला. पोलिसांनी शनिवारी उशिरा गुन्हा दाखल केला आहे. दोन ते तीन वेळा मुलींसोबत असा प्रकार केल्याची कबुली पित्याने पोलिसांना दिली, अशी माहिती तपास अधिकारी पी.पी. चौधरी यांनी दिली.