Join us

वसईत दोन मुलींवर अत्याचार

By admin | Updated: February 5, 2017 01:26 IST

वसईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी अल्पवयीन मुलींवर केलेल्या अत्याचार प्रकरणी वालीव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. एका गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली

पारोळ : वसईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी अल्पवयीन मुलींवर केलेल्या अत्याचार प्रकरणी वालीव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. एका गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी फरार झाला आहे. गावराईपाडा येथे अंगणात खेळत असलेल्या एका ६ वर्षीय मुलीला शेजारील २५ वर्षीय तरुणाने खाऊचे आमिष दाखवून घरात नेऊन अश्लील चाळे केले. याबाबत पीडित मुलीने शाळेतील शिक्षिकेला सांगितल्यावर तक्रार दाखल करण्यात आली. विनयभंग व पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दुसऱ्या घटनेत सात वर्षीय मुलीवर ओळखीच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने गत पंधरा दिवसांमध्ये चार वेळा अत्याचार केले. याबाबत पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली असून वालीव पोलिसांनी बलात्कार व पॉक्सोअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. (वार्ताहर)