कल्याण : खासगी शिकवणीसाठी घरी येणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीवर संदीप महाले या शिक्षकाने अत्याचार केल्याची घटना डोंबिवलीतील गरिबाचा वाडा परिसरात मंगळवारी उघडकीस आली. त्याला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. महात्मा फुले रोडवरील ओमय्या कॉम्प्लेक्समध्ये राहाणारा आरोपी शिकवणीच्या बहाण्याने तिचा वारंवार छळ करत असे. महिनाभरापासून तिच्यावर अत्याचार सुरू होता. अखेर या शोषणाला कंटाळून पीडित मुलीने मंगळवारी पोलीस ठाण्यात तक्रार केली. आई-वडिलांचे छत्र हरपलेली ही पीडित मुलगी ७-८ वर्षांपासून काकाकडे राहते. आरोपी संदीप हा एका खासगी शाळेत शिक्षक असून तो ज्या शाळेत शिकवितो तेथील मुलांना नापास करण्याची धमकी देत आपल्याकडे शिकवणीस येण्यास भाग पाडत असे. पीडित मुलगीदेखील या धमक्यांना बळी पडून त्याच्याकडे शिकवणीला जात होती. (प्रतिनिधी)
शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार
By admin | Updated: July 29, 2015 03:35 IST