Join us

एमडी पावडर देऊन अत्याचार

By admin | Updated: February 22, 2015 02:02 IST

एमडी पावडरच्या आहारी गेलेल्या मुंब्य्रातील सोळावर्षीय मुलीला त्याच परिसरातील पाच मित्रांनी पाच दिवस पावडर दिली आणि तिच्यावर अत्याचार केला.

ठाणे : एमडी पावडरच्या आहारी गेलेल्या मुंब्य्रातील सोळावर्षीय मुलीला त्याच परिसरातील पाच मित्रांनी पाच दिवस पावडर दिली आणि तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने पाच जणांना अटक केली असून त्यांना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.५ फेब्रुवारीला गायब झालेल्या या मुलीच्या पालकांनी ९ फेब्रुवारी रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून प्रशांत सिंगवर संशय वर्तवला होता. १० फेब्रुवारीला तिनेच सकाळी आईला फोन करून भारत गिअर कंपनीजवळ बोलवले. हे प्रकरण ठाणे गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यावर चौकशीत तिच्यावर अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. हा अत्याचार फहाद धनसे, मोहम्मद मेमन, अमजद संग्राम, अक्रम खान आणि अन्य एकाने केल्याचे तिने सांगितले. त्यानुसार, त्यांना १९ फेब्रुवारीला अटक केली.हे पाचही जण मित्र असून, तिच्या ओळखीचे आहेत. त्यांनी तिला एमडी पावडर देऊन तिच्यावर डायघरमधील लॉजवर आणि खोपोलीत अक्रमच्या रूममध्ये अत्याचार केल्याप्रकरणी बाललैंगिक अत्याचारविरोधात गुन्हा दाखल के ल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नागेश लोहार आणि युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफ ोडे यांनी दिली. (प्रतिनिधी) प्रशांतने तिला महिन्यापूर्वी एमडी पावडर दिली व ती नशेच्या आहारी गेली.पीडित मुलीला ठाण्यातून डायघर, मुंब्रा, कल्याण, हाजीमलंग, वाशी, खोपोली, लोणावला आणि पुन्हा डायघर असे फिरवण्यात आले. मुंब्य्रातील फार्महाऊसवर तिची पर्स सापडल्याने तेथे काही घडले होते का, याचा तपास सुरू आहे. यापैकी अमजद संग्राम हा सोनसाखळी चोर आहे.