Join us
Daily Top 2Weekly Top 5

कांदिवलीत पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

By admin | Updated: August 22, 2014 02:18 IST

कांदिवलीच्या एम.जी. रोडच्या पदपथावर झोपलेल्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर एका विकृत तरुणाने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

मुंबई : कांदिवलीच्या एम.जी. रोडच्या पदपथावर झोपलेल्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर एका विकृत तरुणाने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा  नोंदवून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चिमुरडी आई-वडिलांसह रस्त्यावरच राहत होती. नेहमीप्रमाणो काल रात्रीही हे कुटुंब रस्त्यावरच झोपले. पहाटे 6च्या सुमारास आईला जाग आली तेव्हा तिला मुलगी दिसली नाही. तिने पतीला उठवून परिसरात शोधाशोध केली तेव्हा जवळच असलेल्या एका डेअरीसमोर मुलगी जखमी अवस्थेत सापडली. तिला उपचारांसाठी तत्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीत डॉक्टरांना या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार घडल्याचे समजले. तेव्हा त्यांनी ही बाब कांदिवली पोलिसांना कळवली. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्हींचे चित्रण ताब्यात घेऊन तपासणी सुरू केली. त्यापैकी एका सीसीटीव्हीत 25 ते 3क् वयोगटातील तरुण या चिमुरडीला सोबत नेताना दिसला. पोलीस या तरुणाचा चेहरा स्पष्ट करण्यासाठी अन्य सीसीटीव्ही चित्रणाचा बारकाईने अभ्यास करीत आहेत.
 
च्सीसीटीव्हीतल्या चित्रणावरून हा तरुण गदरुल्ला असावा, असा संशय परिमंडळ 11चे उपायुक्त बालसिंग राजपूत यांनी व्यक्त केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी कांदिवली पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.