Join us

ऐरोलीत उद्या भव्य रोजगार मेळावा

By admin | Updated: July 31, 2015 00:10 IST

जीवनधारा वॉर्ड सल्लागार समितीच्या (रोजगार, उद्योग) वतीने १ आॅगस्ट रोजी ऐरोली येथे भव्य रोजगार मेळावा भरविण्यात येणार आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील नामांकित

नवी मुंबई : जीवनधारा वॉर्ड सल्लागार समितीच्या (रोजगार, उद्योग) वतीने १ आॅगस्ट रोजी ऐरोली येथे भव्य रोजगार मेळावा भरविण्यात येणार आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात उमेदवारांच्या मुलाखतीसाठी मार्गदर्शन सेमिनार घेतले जाणार आहे. तसेच मोफत मार्गदर्शन पुस्तिकेचेही वितरण केले जाणार आहे. मेळाव्यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती पत्र दिले जाणार आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. येताना सोबत ७ पासपोर्ट आकाराचे फोटो, बायोडेटाच्या ७ प्रती, निवासाचा पुरावा आणणे आवश्यक आहे. ऐरोलीचे आमदार संदीप नाईक हे या मेळाव्याचे मुख्य आयोजक आहेत. अधिकाधिक तरुणांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)