Join us  

आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टोल फ्री क्रमांक कार्यान्वित  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 3:54 PM

देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 साठीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

मुंबई - देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 साठीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातही आचारसंहितेचे पालन करण्यात येत आहे. आचारसंहितेच्या भंगासंदर्भातील तक्रारींबाबत मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून. विशेष टोल फ्री दूरध्वनी क्रमांकही कार्यान्वित करण्यात आला आहे. 1800222110 असा हा टोल फ्री क्रमांक आहे. आचारसंहिता तसेच निवडणूक खर्च पर्यवेक्षण करण्यासाठी भरारी पथक, स्टॅटिक सर्वेलन्स टीम, व्हिडिओ सर्वेलन्स टीम प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तयार करण्यात आल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात 29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. तर 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघ आहेत, त्यात 26 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर यांनी ही माहिती दिली आहे.

टॅग्स :निवडणूकलोकसभा निवडणूक