Join us
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयाच्या वादातून हत्या?

By admin | Updated: December 9, 2015 01:10 IST

विक्रोळी परिसरात शौचालयाच्या वादातून ५० वर्षीय इसमाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली.

मुंबई : विक्रोळी परिसरात शौचालयाच्या वादातून ५० वर्षीय इसमाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. रुग्णालयात एक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर विनोद तायडे (५०) या इसमाचा मृत्यू झाला. कन्नमवार नगर २ येथील हनुमान नगर परिसरात तायडे कुटुंबीयांसोबत राहात होते. तायडे यांना अर्धांगवायू झाला होता. तायडे कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्तीचे काम सुरूअसल्याने रविवारी दुपारच्या सुमारास तायडे शेजारच्या चाळीतील शौचालयामध्ये नैसर्गिक विधीसाठी गेले होते. तेथील स्थानिक राजकीय कार्यकत्याने त्यांना विरोध करत, त्यांना मारहाण करत खाली ढकलले. यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. काही वेळाने त्यांना विक्रोळीच्या महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी तायडे कुटुंबीयांच्या तक्रारीवरून विक्रोळी पोलिसांत एनसी नोंदविली आहे.तायडेंची प्रकृती चिंताजनक असल्याने, त्यांना नंतर सायन रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तायडेंचा सोमवारी चारच्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे संबधितांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी तायडे यांच्या पत्नी विजया यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. (प्रतिनिधी)