Join us

सखींसाठी आज ‘मनी’ च्या गोष्टी

By admin | Updated: July 2, 2015 22:49 IST

‘मनी’ च्या गोष्टी या कार्यक्रमात प्रसिद्ध वृत्तनिवेदिका दीपाली केळकर यांचे पैशांचे मनोरंजक कथाकथन ऐकण्याची संधी लोकमत सखीमंचाच्या माध्यमातून सखींना मिळणार आहे.

ठाणे : ‘मनी’ च्या गोष्टी या कार्यक्रमात प्रसिद्ध वृत्तनिवेदिका दीपाली केळकर यांचे पैशांचे मनोरंजक कथाकथन ऐकण्याची संधी लोकमत सखीमंचाच्या माध्यमातून सखींना मिळणार आहे. तसेच यावेळी सखींसाठी ‘सखी लक्ष्मी वेषभूषा’ या आगळ्या वेगळ्या फॅशन स्पर्धेचेही आयोजन केले आहे. हा कार्यक्रम ३ जुलै रोजी डोंबिवली येथील सर्वेश हॉल येथे होणार आहे. या स्पर्धेत सखींनी खोट्या किंवा खऱ्या नोटा तसेच नाणी वापरून पैशांची माळ,कंबरपट्टा, बाजूबंद असे विविध दागिने परिधान करायचे आहेत. या कार्यक्रमाचे प्रायोजक एनएसडीएल असून त्यांच्यातर्फे सखींना गुंतवणूक या विषयावर मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे सखींच्या आनंदाबरोबरच त्यांच्या ज्ञानातही भर पडणार आहे. टेस्टी फुडी नेटवर्क हे या स्पर्धेचे गिफ्ट पार्टनर आहेत. स्पर्धेच्या नावनोंदणी व अधिक माहितीसाठी ८६५२२००२२६ आणि ९८७०९१२२३३ या क्रमांकावर संपर्क साधावा. यावेळी सखींना स्टार प्रवाह वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘येक नंबर’ या मालिकेतील देवा म्हणजेच चिराग पाटील आणि वेदा म्हणजेच माधुरी देसाई या सेलिब्रेटींशी गप्पा मारण्याची संधी मिळणार आहे.