Join us
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावी ऑक्टोबर परीक्षेचा आज निकाल

By admin | Updated: November 25, 2014 02:07 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या ऑक्टोबर परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या ऑक्टोबर परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्याथ्र्याना  666.ेंँ1ी24’3.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार असून, विद्याथ्र्याना उपलब्ध गुणांची प्रिंट आऊटही घेता येणार आहे.
नऊ विभागीय मंडळामार्फत 18 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. तर बारावी परीक्षा 18 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल मंगळवार, 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. 
विद्याथ्र्याना संकेतस्थळावर विषयनिहाय गुण उपलब्ध होणार असून त्याची प्रिंटआऊटही घेता येईल. 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता विद्याथ्र्याना गुणपत्रिका शाळा महाविद्यालयांत मिळतील. गुणपत्रिका मिळाल्यानंतर विद्याथ्र्याना 15 डिसेंबर्पयत गुणपडताळणीसाठी अर्ज करता येईल.